कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख – एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस किरणजी ठाकरे सर यांच्या सहमताने कोपरगाव तालुका अध्यक्ष उत्तम भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांकरिता साखळी उपोषण लावण्यात आले आहे आज तिसरा दिवस असूनही प्रशासन आलेले नाही. जर प्रशासनाने आमच्या मागण्यांची पूर्तता पूर्ण केली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन आम्ही करणार आहोत असा तालुकाध्यक्ष यानी सांगितले. उपोषणाचा आज तिसरा दिवस असून तालुक्यातील दररोज एका गावातील आदिवासी बांधव उपोषणाकरिता बसत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण बंद करणार नाही कोपरगाव तालुका अध्यक्ष एकलव्य संघटना उत्तमराव पवार तसेच तालुका सचिव निलेश ठाकरे यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे उपोषणासाठी आरपीआय वंचित बहुजन आघाडी तसेच बहुजन भीम पॅंथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

