
परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- वंचित बहुजनआघाडीच्या मागणीला यश रमाई घरकुल योजनेच्या वाढीव निधीस मंजुरी देण्यात आली परंतु बौद्ध धम्म केंद्राला दमडीही दिली नाही अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा निधीत वाढ करण्यात यावी कारण शासनाने मंजूर केलेल्या अडीच लाख रुपयात कुठल्याच प्रकारचे घरकुल होऊ शकत नसल्यामुळे सदरील घरकुल लाभधारकांचे घरे हे अर्धवट राहिल्यामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत असून पर्यायाने लाभार्थ्यांना व्याजाने पैसे काढून आपले घरकुल पूर्ण करावे लागत होते तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोठा गाजावाजा करून येथील पालकमंत्र्यांनी बौद्धाच्या धम्म केंद्राच्या भूमिपूजन करून आज तब्बल पाच वर्षे होत आहे त्याचा ही निधी मंजूर करण्यात यावा यासाठी 15 ऑगस्ट 2024 रोजी परळी नगरपालिकेपुढे आमरण उपोषण करण्यात आले असता त्याला दमडीही दिली नाही परंतु परळी विधानसभेतील पूर्ण जातीच्या धर्मीयांच्या लोकांना विविध म्हणजे शादी खाना मंदिरे समाज मंदिरे सभागृह यांच्या नावाखाली परळी विधानसभेत 500 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे परंतु बौद्धांची अस्मिता असलेल्या व उद्घाटन केलेल्या बौद्ध धम्म केंद्रास एक कवडीही दिली नसल्यामुळे येथील बौद्धांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे अशाप्रकारे बौद्धांची प्रतारणा होत असून त्यांना फक्त पैसे देऊन खुश करायचे असे प्रकार सध्या होत असल्याची चर्चाही येथील नागरिकांतून होताना दिसत असून रमाई घरकुल योजनेची शासनाने दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमाई घरकुल धारकांना पाच लाख रुपये निधी करण्यात यावा अशी मागणी लेखी मागणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री आयुक्त कार्यालय औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय बीड इत्यादींना निवेदन पाठवले असता त्याची दखल म्हणून काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अडीच लाखावरून साडेचार लाख रुपये करण्यात आले असून ज्या लाभार्थ्यांना 2011 पासून घरकुल मंजूर झालेले आहे अशा नाही वाढीव निधी दोन लाख रुपये देण्याचा ठराव मंत्रिमंडळाने केला असून त्यामुळे रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेल्या मागणीबद्दल लाभार्थ्याकडून वंचित बहुजन आघाडीचे आभार व अभिनंदन करण्यात येत असल्याची माहिती ही वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

