आकाश शिरसाट यांना रामकृष्ण स्मृती राज्यस्तरीय अभंग पुरस्कार 2024 प्रदान

0
82

विधान परिषदचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांच्या हस्ते आकाश शिरसाट यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय विठोबा,तुकोबा, अभंग, पसायदान, पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला बहुमूल्य असा पुरस्कार देऊन आमच्यात नवीन ऊर्जा नवचिंतन निर्माण केली माझ्या कामाची पावती या पुरस्काराने मला मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद,
अकोला जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते त्याच जिल्ह्यात मी आंबेडकर चळवळीसाठी काम करतो याचा आनंद मला वाटतो हे काम करून मी खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जबाबदारी कणभर तरी मी समोर नेण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी दिलेल्या संमतीच्या तत्त्वावर चालण्याचा प्रयत्न करतो. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे समाजावर अन्य अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारा युद्ध बाबासाहेबांचा भीमसैनिक म्हणून काम करणे मला जास्त आवडते, राजकारणात मला फारसा इंटरेस्ट नाही आणि मी राजकारण करतही नाही.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो..याच महापुरुषांच्या विचारावर चालणारा लढणारा संघर्ष करणारा युद्ध असला पाहिजे,तीच काम मी गेल्या अनेक वर्षापासून करतो अनेक जणांनी माझ्या कामाची मजुरी मला दिली नाही कारण की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कडे पाहण्यासाठी त्यांच्याकडे वृत्ती नव्हती परंतु शंभूराजे प्रतिष्ठान यांनी आमच्या समाजकार्याची दखल घेऊन काही कल्पना नसतानाही हा राज्यस्तरीय पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी आमदार अमोल दादा मिटकरी साहेब सदस्य विधान परिषद विधिमंडळ महाराष्ट्र राज्य व शंभुराजे प्रतिष्ठान यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझं पाठबळ वाढवलं त्याबद्दल मी मानाचा सल्यूट करतो. असे आकाश शिरसाट असे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here