लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- लातूर:- भीम आर्मी भारत एकता मिशन लातूर जिल्ह्याच्या वतीने भाई विनय रतन सिंह यांचे हस्ते लातूर येथे सामाजिक न्याय यात्रेच्या निमित्ताने लातुरात आले असता भीम आर्मीचे माजी महाराष्ट्र प्रमुख तथा राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांना भीम आर्मी महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सविस्तर वृत्तांत
दिनांक ११ऑक्टोबर २०२४ रोजी भीम.आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह. हे सामजिक न्याय यात्रेच्या लातुरात पहिल्यांदाच आले होते.या कार्यक्रमाचे नियोजन हे लातूर जिल्हा भीम आर्मी कमिटीच्या वतीने लातूर येथील भालचंद्र बल्ड बँक येथे करण्यात आले होते सर्व प्रथम भाई विनय रतन सिंह याचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रभारी अनिलजी घेंनवाल सुनील गायकवाड सूनिल थोरात, रमेश बलेश, मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसापासून अशोक कांबळे हे शोषित ,पीडित, अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या घरा दाराची कसलीच परवा न करता अहोरात्र महाराष्ट्रातील .अन्याय ग्रस्तांना न्याय मिळून देत असतात ,या कारणास्तव अनेकदा जेल मध्ये यांना जावे लागले आहे तरी पण अशोक कांबळे हे खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने आपले काम सुरू ठेवतात. यांची जिद्द पाहून नवं तरुणांना एक प्रकारे ताकत मिळत असते. आमची भीम. आर्मीची टीम ही त्याच्या कार्याला नेहमीच सलाम करत असते म्हणून आज लातुरात योगायोगाने सामाजिक न्याय यात्रेच्या निमित्ताने भाई विनय रतन सिंह याचे हस्ते भीम आर्मी महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी लातूर जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे, विरिष्ट उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष विशाल पोटभरे , जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, जिल्हा सचिव बबलू शिंदे , जिल्हा संघटक, समाधान कांबळे लातूर, तालुका अध्यक्ष मारोती घनगावकर, औसा ,तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, निलंगा तातुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे , रेणापूर तालुका अध्यक्ष ,अजय चक्रे उदगीर ,राहुल कांबळे, आदी नांदेड अंबाजोगाई, बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

