कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज कोल्हापूर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे शिवतेज माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेचा वतीने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पी.आय.श्री पंकज गिरी साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्या प्रसंगी सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संघटनेची कशा पद्धतीने पोलिसांना मदत होऊ शकते याविषयी चर्चा झाली. यावेळी संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी गिरी गोसावी,उपजिल्हा अध्यक्ष संतोष तोडकर,महिला जिल्हा अध्यक्ष्या कविता कोंडेकर, सुनिल कांबळे, आनंदा डोंगळे, शिरोली एम आय डीसी रिक्षा व टेम्पो असोसिएशन संथापक अध्यक्ष शामराव गिरी गोसावी,पत्रकार प्रदीप जाधव, श्रीनिवास काटवे ,समीर हसबनीस,निता गायकवाड, उपस्थित होते.

