आजची लेख – समाजकारण आणि राजकारण

0
80

समाजातील दुर्बल घटकांना एकत्र करून त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी काम करणे…त्यांना मदत करण्यासाठी काम करणे याला समाजकारण म्हणतात.तर समाजातील दुर्बल व सबल घटकांचे विघटन करून त्यांच्यात तेढ निर्माण करून भांडणे लावून स्वहीतासाठी काम करणे याला राजकारण म्हणतात. निवडणूक लढवताना अश्या प्रकारचे राजकारण करतात.तोडा फोडा आणि जोडा.. हा मंत्र राजकारणात असतो.
राजकारण ही अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे…निवडणूकीच्या वेळी असे निर्णय घेतले जातात.
सत्ता मिळवण्यासाठी देश चालवण्यासाठी असे निर्णय घेतले जातात. राजकारणात पैसा महत्वाचा असतो.. स्वार्थ असतो सत्ता मिळवण्याचा अट्टाहास असतो.देश चालवण्याची इच्छा असते.

समाजाकारणात दिनदुबळ्यासाठी काम करणे हे लक्ष असते… काही माणसे आधी समाजकारण करतात व मग राजकारणात येतात…. काही राजकारणी समाजकारणाचे समाजकार्याचे ढोंग करतात…..
समाजकारणात समुदायाचे गटाचे आयुष्य परिपूर्ण करण्याचा उद्देश असतो…. समाजकारण सत्तेसाठी केले जात नाही.दुर्बल घटकांचा उद्धार करण्यासाठी समाजसेवक काम करतात.
समाजकार्य ही एक संघटीत सेवा आहे…
समाजकारणात जातीभेद, धर्म पंथ यात फरक केला जात नाही.पण या भेदावरच लक्ष केंद्रित करून राजकारण केले जाते.मते मिळवली जातात.निवडणुका लढवल्या जातात.

देश चालवण्यासाठी समाजकारण आणि राजकारण या दोन्हीची गरज आहे… सामाजिक संस्था ह्या दुर्बल घटकांच्या आधार असतात… दुर्बल घटकांना आपण समाजापासून वेगळे करू शकत नाही…. तेही समाजाचा एक भाग असतात… परिस्थितीमुळे गांजलेल्या ,नशीबाने त्रासलेल्या,समाजाने दुर्लक्षित केलेल्या लोकांना सामाजिक संस्था, समाजसेवक यांचा मोठा आधार मिळतो… त्यांच्या जगण्याला थोडीशी का होईना परिपुर्णता येते. म्हणून समाजकारण हा देशाचा एक अविभाज्य घटक आहे.

राजकारणही तितकेच म त्यांचे आहे..कारण देश चालवायला राजकारणाची गरज असते.पण जेव्हा समाजकारण व राजकारण हे दोन्ही घटक एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात तेव्हा देशाची प्रगती होते… पण ही गोष्ट दुर्मिळ आहे तरी…

कवयित्री/लेखिका गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here