सुभाष दरेकर
प्रबोधिनी न्युज
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
९८५८३२२४६६
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील भुमिपुत्र व यशस्वी उद्योजक वृद्धांना व गरजुना नेहमी मदतीसाठी धावून येणारे संदीप दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो व ज्या शाळेत आपण शिकलो ज्ञान संपादन केले त्यांच काही तरी देणं लागतो या उद्दात भावनेने
आज शुक्रवार दिनांक २५ आक्टोंबर २०२४ रोजी आपल्या जि. प . प्राथमीक शाळा हिरडगाव येथील शाळेतील मुलांना खालील प्रमाणे जेवणाच्या डब्याचे वाटप केले
१) चिचकुट वस्ती शाळा विद्यार्थी संख्या २४
२) जि. प. प्रा. शाळा हिरडगाव विद्यार्थी संख्या २२२
३) बेंद वस्ती शाळा विद्यार्थी संख्या २२
एकूण विद्यार्थी संख्या २६८
सर्व मुलांना गावचे सुपुत्र मा.श्री. संदिप ( बापू ) दरेकर यांनी जेवणासाठी डबे भेट म्हणून दिले! मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दिलेल्या दिपावली निमित्त भेटीचं चिज झालं अशी प्रतिक्रिया संदीप दरेकर यांनी दिली
यावेळी हिरडगाव ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच व्हा चेअरमन व संचालक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते

