जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा )- अंकुर सिड्स प्रा.ली. आयोजित अंकुर पीक पाहणी व शिवार फेरी कार्यक्रम वाकेश्वर ( पहेला ) येथील प्रगतिशील शेतकरी किशोर अतकरी यांचे शेतावर नुकताच संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अंकुर कंपनीचे झोनल मॅनेजर सुरेश ढोके, ए.एस.एम.कमलेश गौतम,वाकेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी किशोर अतकरी,वळद येथील प्रगतिशील शेतकरी योगराज येलमुळे आदी उपस्थित होते.
ह्याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी किशोर अतकरी यांचा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन झोनल मॅनेजर सुरेश ढोके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील चारशे ते पाचशे शेतकरी उपस्थित होते.शेतकरी बांधवांनी किशोर अतकरी यांचे शेतामध्ये लागवड केलेल्या कल्पना आणि पदमा वानाच्या धान्याची पाहणी केली.उपस्थित शेतकऱ्यांना झोनल मॅनेजर सुरेश ढोके आणि ए.एस.एम.कमलेश गौतम यांनी अंकूर कंपनीच्या विविध प्रकारच्या बियानांची सविस्तर माहिती दिली.o
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार अंकुरचे प्रतिनिधी यशवंत गौरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अंकुरचे पवनी तालूका प्रतिनिधी दिनेश चेटूले,समीर कुर्झेकर त्याचप्रमाणे अंकुर सिड्स कंपनीचे इतर प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

