prabodhini news logo
Home चंद्रपूर हजारोंच्या साक्षीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल करणार नामांकन

हजारोंच्या साक्षीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल करणार नामांकन

0
114

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांची उपस्थीती – ब्रम्हपुरीत महारॅलीतून करणार शक्तिप्रदर्शन

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. आगामी महिन्याच्या २० तारखेला संपूर्ण राज्यात मतदान होणारं आहे. या पार्श्भूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे तिसऱ्यांदा ब्रम्हपुरी मतदार संघातून निवडणूक लढविणार असुन याकरिता आज छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या विशेष उपस्थितीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्ष नेते व पदाधिकारी यांसह हजारोंच्या साक्षीने नामांकन दाखल करणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका घोषित होताच सर्व राजकीय पक्ष यांनी उमेदवारी देण्यापूर्वी प्रत्येक मतदार संघाची कसून चाचपणी सुरू केली. यात राजकिय नेत्यांच्या पक्षांतर्गत बैठकी, उमेदवारांची निवड यात बराच कालावधी लोटला. आता उमेदवारी नामांकन दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार हे तिसऱ्यांदा नामांकन दाखल करणारं आहेत. या पार्श्भूमीवर छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांची प्रमूख उपस्थीती राहणार असुन तत्पूर्वी सकाळीं ११.०० वाजता ब्रम्हपुरी शहरांतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणात आयोजित सभा तसेच येथूनच निघणाऱ्या भव्य महारॅली करीता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रांतील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यांतील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. आयोजित महारॅलीचा प्रशासकीय भवन येथे समारोप होईल. आयोजित नामांकन दाखल करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रातून सर्व काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष नागरिकांनी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन ब्रम्हपुरी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here