गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज: स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चौरेचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात लातूर जिल्ह्यातील कवी प्रा . पंढरी सोपानराव बनसोडे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “वंचिताची दिवाळी” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
प्रा. पंढरी सोपानराव बनसोडे हे लातूर येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवी व साहित्यिक आहेत. बलभीम महाविद्यालय येथे ते सहाय्यक प्राध्यापक होते. तर अलीकडे ते श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, उमरगा येथे कार्यरत आहेत. त्यांचे “तू घे भरारी, शब्दफूले, भारताचा पाया, आणि टाहो” इ. काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना विविध स्पर्धांतून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या चौरेचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने ऊकंडराव नारायण राऊत, पी. डी.काटकर, प्रा. पंढरी बनसोडे, राजरत्न पेटकर, पुनाजी कोटरंगे, रोहिणी पराडकर, किशोर बोरकुटे, संतोष कपाले, संगीता ठलाल, रेखा दिक्षित, लता शेंद्रे, संगीता रामटेके, वंदना सोरते, वंदना मडावी, तुळशीराम उंदीरवाडे, अजय राऊत, मुर्लीधर खोटेले, राजेंद्र यादवराव सोनटक्के, कृष्णा कुंभारे, रोशन येमुलवार, चरणदास वैरागडे, यामिनी मडावी, नरेंद्र गुंडेली, माधुरी अमृतकर, प्रिती ईश्वर चहांदे, शैला चिमड्यालवार, विलास टिकले, वामनदादा गेडाम, जयराम धोंगडे, खुशाल म्हशाखेत्री, डॉ. मंदा पडवेकर, सुनिल चडगुलवार, सुजाता अवचट, मधुकर दुफारे, कु. भावना रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

