prabodhini news logo
Home ठळक बातम्या ब्रम्हपुरी क्षेत्रात उद्योग, रोजगार, मूलभूत सुविधांसह सर्वांगिण विकासावर भर – विजय वडेट्टीवार

ब्रम्हपुरी क्षेत्रात उद्योग, रोजगार, मूलभूत सुविधांसह सर्वांगिण विकासावर भर – विजय वडेट्टीवार

0
112

पदयात्रेतून साधला मतदारांशी संवाद

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

लोकप्रतिनिधित्व हे जनसेवेसाठी निर्मिलेले संविधानिक पद आहे. मला मागील दहा वर्षांपासून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जनतेने जो विश्वास दाखवून लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. त्याकरिता मी समर्पित भावनेने आजवर कार्य केले व क्षेत्राचा विकास साधला. येणाऱ्या काळात ब्रम्हपुरी क्षेत्रात उद्योग, रोजगार, मूलभूत सुविधा, यासह क्षेत्राचा सर्वांगीण विकास यावर अधिकाधिक भर दिला जाईल. व आपले क्षेत्र राज्याच्या प्रगतीपथावर सर्वोच्च स्थानी राहील. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
विधानसभा निवडणुकी प्रचारार्थ आयोजित पदयात्रा व जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
आयोजीत जनसंवाद यात्रेतून अड्याळ जानी, भगवानपुर, चोरटी, चांदगाव, परसोडी, मुडझा, हळदा, बोडधा, व ब्रम्हपुरी तालुक्यांतील विवीध गावातील नागरिकांशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला. यावेळी बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगीतले की, मी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जी विकास कामे केली व आज जो विकास तुमच्या पुढे आहे त्याचा लेखाजोखा देण्याकरिताच मी आपल्याशी संवाद साधत आहे.
मागील दहा वर्षांपूर्वीच्या काळात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रावर भाजपचे वर्चस्व होते. यादरम्यान येथील लोकप्रतिनिधींनी जनतेचा प्रचंड भ्रमनिरास करून क्षेत्राला विकासापासून कोसो दूर ठेवले. तर कधीकाळी शासन स्तरावरून अल्पसा निधी आणून त्याचा गाजावाजा करण्यासाठी वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळवून जनतेची दिशाभूल केली. यांच्या खोटारड्या विकासाला जनतेने ओळखून भाजपला बगल देत माझ्याकडे दहा वर्षे विकासाची सूत्रे दिली. या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास करून येथे मूलभूत सुविधांसाठी प्रमुख मार्गांचे मजबुतीकरण, नदी, नाल्यावर पूल बांधकाम, अंतर्गत पक्के रस्ते, सिंचनाकरिता गोसीखुर्द धरणातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून, शुद्ध पेयजल करिता गावोगावी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी, प्रशासकीय प्रशस्त इमारती, विद्यार्थ्यांसाठी ई -लायब्ररी व गावोगावी वाचनालये, खेळाळूसाठी क्रीडांगण यासह आरोग्य सेवेकरिता प्रशस्त इमारती ,रुग्णवाहिका तसेच सामाजिक कार्यअंतर्गत कर्करोग रोगनिदान व मोफत शस्त्रक्रिया हजारो वृद्धांना मोफत चष्मे वाटप अशी विविध लोकोपयोगी कामे केल्याचे तसेच येणाऱ्या काळात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मोठी उद्योगक्रांती घडवून युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार हे केवळ आश्वासन नसून हे अभिवचन असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर बोलतांना सांगीतले.
गाव भेटी दरम्यान नागरिकांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करीत बैलगाडीतून मिरवणूक काढून प्रचंड उत्साहाने स्वागत केले. यावेळी सर्व गावातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला भागिनी, युवक तथा नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here