prabodhini news logo
Home ठळक बातम्या गवर्ला (चक) येथील भाजप कार्यकर्त्यांचां काँग्रेस मध्ये प्रवेश

गवर्ला (चक) येथील भाजप कार्यकर्त्यांचां काँग्रेस मध्ये प्रवेश

0
118

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थीतीत पक्ष प्रवेश

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावात अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन ब्रम्हपुरी तालुक्यातील गवर्ला (चक) येथील भाजप ग्राम अध्यक्षांसह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या दहा वर्षात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासह ब्रम्हपुरी तालुक्यात सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना, मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे, रोजगार, शिक्षण, आरोग्य, क्रीडा अशा विविध कार्यातून त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक, राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून ब्रम्हपुरी तालुक्यातील गवर्ला (चक) येथील भाजप ग्राम अध्यक्ष दिलीप राऊत यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तीडके , शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, अण्णा ठाकरे, बंटी श्रीवास्तव, मांगली चे चंद्रकांत राऊत, राजु दोनाडकर, भावेश दोनाडकर, हेमराज पिल्लेवार, चंद्रमणी चहांदे यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थीती होती.
आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे. मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे, त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती ही तुमच्या कडूनच मिळाली आहे. तुमच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काॅंग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये गवर्ला (चक) चे दिलीप राऊत, राहुल ठाकरे, अंताराम दोणाडकर, यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here