prabodhini news logo
Home ठळक बातम्या साहित्य दर्पण कला मंच नागपूर राज्यात अव्वल स्थानावर..

साहित्य दर्पण कला मंच नागपूर राज्यात अव्वल स्थानावर..

0
183

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समूहाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन शतक यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.या समूहाची स्थापना दिनांक ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली.
साहित्य दर्पण कला मंच या राज्यात अव्वल स्थानी असलेल्या साहित्य समूहात दररोज नवनवीन विषयावार लिहिण्याची विशेषतः नवोदित साहित्यिकांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.या समूहाने अल्प कालावधीत तीन शतक यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राज्यातील आणि राज्याच्या बाहेरील दिग्गज साहित्यिकांनी आपल्या दर्जेदार काव्यातून आणि मनोगतातून समूहाच्या अलौकिक कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.यात जवळपास १८६ साहित्यिकांनी सहभाग नोंदविला हे विशेष.अनेक मान्यवर साहित्यिकांनी या समूहाचे गोड शब्दात कौतुक करताना आपल्या काव्यातून तसेच मनोगतातून आपले विचार व्यक्त करताना सांगितले आहे की ,साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र हा साहित्य समूह राज्यात अव्वल स्थानी असल्याचे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले आहे.
या समूहाच्या समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असून साहित्यिकांच्या लेखणीचे कौतुक आपल्या अभिप्रायातून व्यक्त करीत असतात त्यामुळे या समूहात दिवसेंदिवस साहित्यिकांची संख्या वाढत आहे.आज या समूहात ५८७ सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके यांनी या समूहाच्या उन्नतीसाठी स्वतः ला वाहून घेतले असून आज ते राज्यातील साहित्यिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.कवी कवयित्री यांच्या रचनेचे वाचन करून अगदी सुंदर शब्दात अभिप्राय नोंदवित असतात.वेळप्रसंगी त्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत असतात.प्रा.नानाजी रामटेके नियमित समूहात उपक्रम विषय आयोजित करून त्यांच्या लेखणीला प्रेरणा मिळावी यासाठी सतत समूहात लक्ष देत असतात आणि यामुळेच या समूहाने अल्प कालावधीत तीन शतक यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.या समूहाच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांशी जिवाभावाचे स्नेहभाव जुळून आल्याचे समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके यांनी सांगितले.
या प्रसंगी सर्व मान्यवर साहित्यिकांचे आभार समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर ,समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके ,समूह कार्याध्यक्ष मधुकर गोपनारायण ,समूह प्रशासिका वैशाली खंडारे,समूह निरिक्षिका माला मेश्राम ,समूह मार्गदर्शक डॉ.हरिश्चंद्र धिवार यांनी मानले असून त्यांना पुढील साहित्यीक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here