prabodhini news logo
Home ठळक बातम्या सम्यक दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर तर्फे महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र....

सम्यक दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर तर्फे महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र. ९ चा निकाल घोषित

0
155

“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी” ठरले मा. कवी – प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर, तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या मा. कवयित्री- सुरेखा बोरकर, नागपूर

सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महत्वपूर्ण विषयांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
२६ नोव्हेंबर संविधान दिन या दिनाचे औचित्य साधून समूहात यावेळी स्पर्धा क्र.९ करिता “संविधान दिन” हा विषय देण्यात आला होता. या विषयावर अनेक कविता आणि लेख आले. नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण रचनांचा सन्मान केला गेला. सर्व रचना व लेख वाखाणण्याजोगे होते. “संविधान दिन” या विषयावर सर्वानी अतिशय सुंदर भावस्पर्शी कविता लिहून संविधानाचे महत्त्व व गौरवोद्गार कवितांच्या माध्यमातून व्यक्त केले. “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र. ९ ही दि. २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली होती.

या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी “महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर यांना मिळाला आहे. कवी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथे कनिष्ठ व्याख्याता या पदावर कार्यरत आहेत. अनेक साहित्य समूहात त्यांचे सातत्याने कविता लेखन व सकाळ सदर लेखन सुरू आहे. त्यांना अनेक महत्वपूर्ण आँनलाईन व आँफलाईन साहित्य पुरस्कार प्राप्त असून विविध साहित्य समूहाचे अनेक आँनलाईन सन्मानपत्र देखील प्राप्त आहेत.

या स्पर्धेत “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” चा सन्मान कवयित्री मा.सुरेखा बोरकर, नागपूर यांना मिळाला आहे. कवयित्री अनेक नियतकालिक, वृत्तपत्र, मासिके ई. तून कविता लेखन करीत आहेत. अनेक साहित्य समूहातून त्यांना आँनलाईन सन्मानपत्र व पुरस्कार मिळाले आहेत.

दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सम्यक दर्शन साहित्य समूहाचे संस्थापक देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान हे आहेत तसेच सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.

या समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जातो. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here