prabodhini news logo
Home ठळक बातम्या मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे पथनाट्यद्वारे पीक विमा जनजागृती

मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे पथनाट्यद्वारे पीक विमा जनजागृती

0
126

वाशिम जिल्हा प्रतिनिधी सागर शिंदे – मालेगाव : तालुक्यातील ग्राम चिवरा येथे मालेगाव तालुका कृषी अधिकारी देवकर तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्यद्वारे पीक विमा जनजागृती करण्यात आली. पथनाट्यद्वारे शेतकर्‍यांना पीक विम्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच शेतकर्‍यांना 15 डिसेंबर पूर्वी आपल्या पिकाचा विमा करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शेतकर्‍यांना कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन तसेच चॅट बोट बदल माहिती देण्यात आली. हे पथनाट्य भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी योगेश आरू यांच्या नेतृत्वाखाली मंगेश बळी, प्रदीप श्रीखंडे, गजानन सोनुने, सुजाता इंगोले, स्वाती दळवि,आणि शीतल यांनी सादर केले. या प्रसंगी गावाचे कृषी सहायक सोळंके सर गावाचे सरपंच पोलीस पाटील तालुका प्रतिनिधी गोपाल नवघरे,सुरेश आढाव, अनिल आखंड उपस्थित होते. तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here