कृषि अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर

0
93

भंडारा जिल्हा प्रतिनिधीजयेंद्र चव्हाण – भंडारा – महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत पवनी तालुक्यातील मौजा केसलवाडा (चिखली) गावात रब्बी हरभरा पिकाचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे वितरण करून पिक लागवडीच्या सुरुवातीपासून तर पिकाची काढणी व विक्री व्यवस्थापन तसेच प्रक्रिया करून मुल्यवर्धन करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर प्रकल्पातील शेतकऱ्यांना पिकाच्या अवस्थेनुसार शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहेत व प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रयोग करून दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी पारंपरिकरीत्या घेत असलेल्या शेती पद्धतीत बदल करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

हरभरा प्रकल्पात प्रामुख्याने पेरणी आधी बीजप्रक्रिया करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर नियंत्रित लागवड व कमी बियाण्याचा वापर करून लागवडीकरीता पेरणी यंत्राचा वापर करणे, सिंचन व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग नियंत्रण करीता जैविक व सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणे, पिकाचे शेंडे खुडणे, घाटे अळीच्या नियंत्रण करीता शेतात पक्षी थांबे उभारणे, कामगंध सापळे लावणे, अशा विविध तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात येत आहे. त्याचबरोबर रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा सल्यानुसार नियंत्रित वापर करून उत्पादन खर्च कमी ठेवून शेतकर्यांचा निव्वळ नफा वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच अळीच्या व्यवस्थापन करीता शेतकऱ्यांना 50% अनुदानावर एमामेक्टिन बेंजोऐट या रासायनिक औषधाचे वितरण सुध्धा करण्यात येत आहे.

सदर प्रकल्प यशस्वी करण्याकरीता वरिष्ठ कृषि अधिकारी व कृषि शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शना खाली कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक भूमेश नवखरे व कृषि सहाय्यक श्रितेश किकराळे हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. तसेच विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील प्रेरित करीत आहेत. तसेच परिसरातील इतर पात्र शेतकऱ्यांनी देखील कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन व आवाहन पर्यवेक्षक श्री नवखरे करत आहेत. याकरिता गावातील शेतकरी मधुकर माटे, देविदास चव्हाण, रामभाऊ फुंडे, मधुकर गजभिये व इतर शेतकरी यांचे सहकार्य व प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here