हृदयाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पालघर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – रस्त्यात खेळत असलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या अंगावरून वाहनचालकाने कार नेल्याची घटना वसई येथे घडली आहे. हृदयाचा थरकाप उडवणारी अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात सहा वर्षाचा चिमुकला जखमी झाला आहे.
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सर्व तिच्यासाठी
राघव कुमार चव्हाण हा सहा वर्षाच्या चिमुकला वसईतील वालीव परिसरातील नाईकपाडा परिसरात आपल्या घराच्या जवळच रस्त्याच्या आसपास खेळत होता. याचदरम्यान तेथील एका इसमाने ओला ॲपवरून बुक केलेली कार आली, कार बुक केलेल्या इसम या कारमध्ये बसला. त्यानंतर कारचालकाने कार समोरच खेळात रमलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्या राघवकडे दुर्लक्ष करत थेट त्याच्या अंगावरून कार नेली. चिमुकला कारच्या चाकाखाली आल्याचे लक्षात आल्यानंतर देखील कारचालकाने कार थांबवली नाही. थेट चिमुकल्याच्या अंगावरून कार नेऊन कोणतीही फिकीर न करता तेथून निघून गेला. परिसरातील स्थानिकांनी त्याला संपर्क करून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालक तेथून निघून गेला.
अपघाताची ही संपूर्ण घटना परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारचालकाने चिमुकल्या राघवच्या अंगावरून कार नेल्यानंतर काही क्षणातच राघव उभा राहिल्याचे त्याचप्रमाणे कारचालकने बेदकारपणे भरधाव कार कशाप्रकारे चिमुकल्याच्या अंगावरून नेली हे देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. सुदैवाने या भीषण अपघातात चिमुकल्या राघवचे प्राण वाचले असेल तरीही तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी कारचालकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

