भिरभिर फिरतो
चमचम काजवा
मनात उडतोय
प्रीतीचा पारवा
शोधते नजर
तुलाच दूरवर
उरात बसलाय
रूप मनोहर
प्रीतरंग उडवी
प्रेमाचा फवारा
चोहीकडे वाहे
सुगंधीत वारा
घेऊनिया आला
संदेश हा नवा
मन जोडणारा
प्रीतीचा पारवा
सांगून गेला खूप
हितगुज नविन
आनंदी थव्यात
बांधुनिया विण
कवयित्री हर्षा भुरे
भंडारा

