आईच्या सावलीत सापडते
सुख-दुःखात ऊब मायेची
हे जीवन तिच्यासाठी अर्पण
संकटात मिळते सावली छायेची…
आईच हसू तिचे आसव
नजरेत तिच्या हरित सुष्टीदान
सार जग सांगत तिच महत्त्व
आई म्हणजे विश्व महान…
आई जीवनाचा खजिना आहे
तिच्या कुशीत सारे प्रश्न मिटतात
शब्दात असते असीम प्रेरणा
सहवासाने तिच्या विश्वास वाढतात…
तिचं रागावणही असत गोड
आई म्हणजे मातृत्वाची खान
तिचा अनमोल सहवास हाच
जीवनत निर्सगाने दिलेलं वरदान…
डोळ्यांत साठवते स्वप्नांची दुनिया
स्वप्नांना द्या तिच्या नवे आकाश
तिच्याशिवाय पूर्णत्व नाही मनाला
आईच आयुष्याचार खरा प्रकाश…
आई म्हणजे जीवनाचा सार
तिला अर्पण माझ सर्व काही
तिच्या स्पर्शाने मिळते प्रसन्नता
आईशिवाय दुसर कोणी मोठं नाही…
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

