कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – दिनांक 27 /12/2024 कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात पुन्हा एकदा अपंग व्यक्तींसाठी साहित्य वाटप झालेली आहे. दरवर्षी सालाबाद प्रमाणे ग्रामपंचायत स्वनिधीतून 5% रकमेतून अपंगांना पाण्याचे जार वाटप केले. आणि मागच्या वर्षी किराणा वाटप करण्यात आले होते. या साहित्य वाटप मुळे अपंगांचा घरगुती फायदा झालेला आहे. सदर किराणा व जार वाटप हे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. या साहित्यामुळे अपंग व्यक्तींच्या जीवनामध्ये काहीतरी आधार निर्माण झालेला आहे असे अपंग संघटनेचे अध्यक्ष . व उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले. व असेच अपंग व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून वेळेवर मदत व्हावी असे त्यांनी सांगितले.
. प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सौ.सुनिता नानासाहेब बनसोडे उपसरपंच श्रीमती शिला शशिकांत चांदगुडे सदस्य विनायक भाऊसाहेब गाडे ,निळकंठ दिनकरराव चांदगुडे शिवदत्त प्रल्हाद गाडे,शोभा देविदास कासोदे, विकास भाऊसाहेब चांदगुडे चांगदेव रघुनाथ माळी,प्रिती सुनिल गायकवाड जयश्री भागिनाथ धेनक हिराबाई भास्कर पवार अनिता कैलास पवार नानासाहेब शंकर बनसोडे पवनकुमार शशिकांत चांदगुडे ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ भिमा पटाईत कर्मचारी याेगेश साईनाथ चौरे राजकुमार बाबासाहेब गोसावी संतोष एकनाथ पवार वैभव ज्ञानेश्वर लकारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

