prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – बळीराजा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – बळीराजा

0
143

दुष्काळी ओसाडची ते त्याचे शेत आहे
तेथेच त्याचे झाडा गळफासी प्रेत आहे

कर्जाचा महा डोंगर बळीराजा डोईवरी
तरी सावकार गैरफायदाच तो घेत आहे

पडला प्रपंच पहा तो त्याचा उघड्यावरी
तरी सावकारी जप्तीही त्वरीच येतआहे

केली शेती भाती सारी आपुल्याच नावा
तरी घरादारा उरलंसारलंही तो नेत आहे

जावे धुनीभांडी ती करावया शेजा-यांची
तर जोतो कसा बरं दृष्ट नजर नशेतआहे

सा-या जगाचा पोशिंदा माझा बळीराजा
खरोखर त्याचेच नांव बघाना चर्चेत आहे

सदा काबाडकष्ट करोनी शेतकरी माझा
पीक धान सा-यानाच सदैवची देत आहे

अर्धांगिणीने विरही अवनीअंतरंगी जावे
तर चिमूरडं पाखरुही साथी कवेत आहे

सुर्यास्ती अंधार दाट दाटलया,तरी पाहू
काय दडलया भविष्य नवं उषे:त आहे

कवी बी.डी.घरत
खारकोपर, पनवेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here