माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते नाटकाचे उद्घाटन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा (गणेशपुर)येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना चिचखेडा मंडळाच्या वतीने “व्यथा एका कुटुंबाची” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला प्रभाकर सेलोकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्ये. उपाध्यक्ष म्हणून.थानेश्वर कायरकर मा.प.स.सदस्य, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे विशेष अतिथी. संजना घुटके सरपंच चिचखेडा,लोकेश चौके उपसरपंच चिचखेडा, भाष्कर राऊत,प्रशांत मानकर ग्रा.प.सदस्य,धंनराज मांदाळे ग्रा.प.सदस्य,उमेश मानकर पो.लिपीक नागपुर,प्रदिप ठाकरे,रमेश मानकर लाईनमॅन, नितीन गजबे उपसरपंच कळमगाव,विलास जांबुळे पो.पा.चिचखेडा,यशवंत मानकर मा.अध्यक्ष.तं.मु.स,महादेव नन्नावरे मा ग्रा.प.सदस्य,अतुल चौधरी ग्रा.प.कर्मचारी, राजेंद्र मरस्कोल्हे,अन्य मान्यवरांचीही उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की,ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही लोककला आणि परंपरा जतन करणे आपले कर्तव्य आहे. अशा नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या कलागुणांना चालना मिळते. ‘व्यथा एका कुटुंबाची’ हे नाटक केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला विचार करायला लावणारा संदेश देते. या उपक्रमातून समाजातील एकात्मता वृद्धिंगत होते आणि कलेला नवीन दिशा मिळते. आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, ज्यामुळे आपली संस्कृती अधिक संपन्न होईल.”
खास नागदिवाळी महोत्सव निमीत्य आयोजित “व्यथा एका कुटुंबाची” या नाटकाचा चिचखेडयातील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना नाट्य कला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

