आदिवासी समाजाचा ग्रामपंचायत व m.s.c.b कार्यालयात जमाव

0
319

नवनाथ उल्हारे कोपरगाव तालुका प्रतिनिधी दिनांक 2-1-2025 कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात सदर बंच कंडक्टर हा सिरीयल असून सदर प्रस्ताव हा शासन स्तरावरील R.D.S.S योजनेअंतर्गत केबल बसवल्यामुळे सर्व समाज बांधव अंधारात झाले आहे. व याच्यातून चोरी .दरोडा आणि बिबट्याचे प्रमाण वाढवू शकतात.
त्यामुळे आदिवासी समाज एकत्र येऊन आम्हाला नवीन लाईट कनेक्शन द्या व जुने थकीत बिल माफ करा असे निवेदन पत्र ग्रामपंचायत व M.s.c.b ऑफिस यांना देण्यात आले. सदर निवेदन पत्राचा विचार केला नाही तर आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने उपस्थित होऊन कार्यालयावर मोर्चा करणार अशी आदिवासी विकास परिषद संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब माळी व सुखदेव माळी यांनी सांगितले.
या उपस्थितीत दिनकर सोमा माळी बापू कासोदे ग्रामपंचायत सदस्य लहानु किसन माळी सोपान नामदेव धेनक संतोष रंगनाथ माळी निलेश पगारे रमेश सूर्यवंशी सोमनाथ पवार कमलाबाई जाधव नवनाथ जाधव अंकुश पगारे अंकुश गांगुर्डे लक्ष्मण वाघ व लक्ष्मण मोरे या सर्वांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here