सर्व धर्म सम भाव महिला मंडळ तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ या परिसरामध्ये सर्व धर्म सम भाव महिला मंडळ तर्फे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, स्त्रीमुक्ती दिन, बालिका दिन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपचे युवा जिल्हा संघटनमंत्री मनीष राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वाघधरे ताई यांनी तर आभार प्रदर्शन मेश्राम ताई यांनी केले. कार्यक्रमातील उपस्थिताना कुडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्रशासनाला ३ जानेवारी शिक्षक दिन म्हणून जाहीर करून फुले दांपत्याना भारतरत्न द्यावे अशी विनंती त्यांनी केली यावेळेस मंडळातील अनेक सदस्य तथा वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

