कधी कधी आपण
शब्दावाचून बोलावं
निखळ प्रेमाचं नात
आपलं जोपासावं…
खोटेपणाला कधीच
प्रेमात जागा नसावी
विश्वासाच्या पूलावर
प्रीत कायम टिकावी…
तुझ्या प्रत्येक क्षणात
मी नवीन रंग भरावा
आपल्या नात्याचा
दिवा तेवत ठेवावा…
तुझं हसणं माझं
बळ नेहमी असावं
निखळ प्रेमाने तुझं
मी जगणं सजावं…
जवळ असो का दूर
प्रीत मनात राहावी
संपूर्ण आयुष्य आपली
साथ सोबत असावी…
कवयित्री जयश्री वागरे/ धुतराज
शिक्षिका, नांदेड

