कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारें – दि.26-1-2025 कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील या शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व तसेच संविधाना नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे हे पूजन करण्यात आले.
या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण चास नळी गावातील पहिले लोकनियुक्त सरपंच सुनिता बनसोडे व नानाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे व ग्राम विकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य. प्रकाश शिंदे पोलीस पाटील. विनोद चव्हाणके डॉक्टर लॅब. संतोष पऱ्हे. पवन कुमार चांदगुडे ग्रामपंचायत सदस्य. ज्ञानेश्वर धेनक. सोपान धेनक. माणिकराव चांदगुडे. वसंत पवार. यांच्या हस्ते भारत माता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची पूजा करण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रातील गायन भाषण नृत्य यांच्या आधारे मान्यवरांचे मन वेदले. व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस प्रमाणपत्र देऊन उत्साहित केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चास नळी शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. तसेच शाळेतील वर्ग शिक्षक कचरे,मोगरे मॅडम, माळी, पारसुर, गोडे, चौधरी यांनी कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केले होते.

