माजी विरोधी पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवारांची राहणार प्रमुख उपस्थिती
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज 7588790053 – ब्रम्हपूरी हाॅकी असोसिएशन तर्फे आमदार चषक आमंत्रित राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन आज दि. ३० जानेवारी रोजी सायं. ५ वाजता ब्रम्हपूरी येथील तालुका क्रिडा संकुल येथे होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे. तर अध्यक्ष म्हणून खासदार डॉ नामदेव किरसान हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष प्रा.सुभाष बजाज, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, तहसीलदार सतीश मासाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, प्राचार्य देवेश कांबळे, तालुका क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, प्राचार्य देविदास जगनाडे, प्रेरणा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष मदन मेश्राम, हाॅकी उपाध्यक्ष मनिषा आकरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून हाॅकीचे संघ ब्रम्हपूरी मध्ये दाखल झाले असून रोमांचक सामन्यांचा थरार ब्रम्हपूरीकरांना अनुभवायला मिळणार आहे.
सदर स्पर्धेला क्रिडाप्रेमींनी व ब्रम्हपूरीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

