prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वसंत ऋतू

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वसंत ऋतू

0
95

चढवून साज नवचैतन्याचा
आला आला यौवनाचा
सुमधुर आनंदसोहळा आला
आला वसंत ऋतू हा आला …

फुटली नवपालवी झाडांना
नविन गाणी नवीन घरट्यांना
नवबहर फळाफुलांना आला
आला वसंत ऋतू हा आला

पळस पांगारा, शाल्मली,सावरी
नटल्या रंगानी पिवळ्या गुलाबी लाल केशरी
आसमंत रंगपंचमी खेळू लागला
आला वसंत ऋतू हा आला …

चराचरावर दरवळ फुलांचा मोहिनी रंगांची
काय वर्णावी शोभा वसुंधरेची
मधुरस सोहळा, आंब्याला मोहोर आला
आला वसंत ऋतू हा आला

सहा ऋतूंचे सहा सोहळे
वसंतऋतूचे वैभव आगळे
रंगांचा उत्सव घेऊनी आला
आला वसंत ऋतू हा आला

कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here