83 हजारांची लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
64

तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583- वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन कार्रवाई टाळण्यासाठी 83 हजारांची लाच घेताना आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कार्यरत वनपाल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असुन मारोती गायकवाड असे त्या लाचखोर वनपालाचे नाव आहे. ही कारवाई 8 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
वन विकास महामंडळ प्रकल्प आलापल्लीतील आलापल्ली वनपरिक्षेत्रात समाविष्ट आपापल्ली उप क्षेत्रातील ताणबोडी बीटातून फिर्यादी घरकुल बांधकाम करण्यासाठी माती वाहतूक करत होता सहा फेब्रुवारी रोजी एफडीसीएमच्या आल्लापल्ली कार्यालयातील वनपाल मारुती गायकवाड आणि वनमजुरांनी सदर ट्रॅक्टर पकडून दुसऱ्या दिवशी तडजोडी साठी कार्यालयात बोलावले मारुती गायकवाड यांनी फिर्यादीला तब्बल एक लाख दहा हजाराची मागणी केली तडजोड अंती एक लाख देण्याचे ठरले 17000 दंड पकडुन त्यांनी 83 हजार परस्पर रक्कम स्वीकारले मात्र फिर्यादीला लाभ देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या पथकाकडे याची आधीच तक्रार केली होती एसीबीच्या पथकाने आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मारुती गायकवाड यांना लाच स्वीकारताना आ ल्लापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

ही कारवाई गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here