जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ पारितोषिक वितरण

0
59

ठाणे प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १८ जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम दि. १७ जानेवारी, २०२५ रोजी, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांना बी. जे. हायस्कूल येथे दि. १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी विविध कला प्रकारातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कलेला वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद आयोजित कलाविष्कार २०२५ कार्यक्रम अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा असून सर्वांनी उत्साहपुर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडला असून विविध कला सादर केलेल्या विजेत्यांचा सत्कार केला. प्रत्येकाने विविध कला गुणांना आत्मसात करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी – कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले.

यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत / स्वच्छ भारत मिशन प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता बांधकाम/ पाणीपुरवठा संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here