ठाणे प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १३ – छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकणे म्हणजे जीवन जगण्याला मोठी ऊर्जा मिळते. शिवरायांचे आचार, विचार, पराक्रम, रयतेवरील राजाचं प्रेम, युद्ध तंत्र, या सर्व गोष्टी आपल्याला प्रचंड ऊर्जा आणि आनंद देणाऱ्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण सुरू करण्यात आले आहे.
शाळेतील शिवचरित्र पारायणाचे हे चौथे वर्षे आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे ३ फेब्रुवारी पासून शिवचरित्र पारायणाला सुरूवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि संतांची कामगिरी, कथा विद्यार्थ्यांसमोर कथन करून या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे तर शिक्षक अंकुश ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म, प्रताप गडावरील पराक्रम, संध्या जगताप यांनी शिवरायांचे बालपण, चित्रा पाटील यांनी स्वराज्याची शपथ, तर माया सोनकांबळे यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ही कथा उत्कृष्टपणे सादर केले आहेत. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त, रसिका पाटील यांनी पन्हाळगडावरून विशालगडावर ही कथा मुलांना सांगितली.
या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची असून ३ फेब्रुवारीपासून सुरू झालेले शिवचरित्र पारायण १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मुलं अत्यंत तन्मयतेने या कथा ऐकत आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ढोल, ताशा, लेझीम च्या गजरात संपूर्ण गावातून राजांची मिरवणूक काढून शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी असे विशेष उपक्रम सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी घ्यावे, असे आवाहन यानिमित्ताने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
शिवचरित्र पारायणावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा घेतली आहे. तसेच शनिवारी पावनखिंड हा चित्रपट दाखविला. या शिवचरित्र पारायणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.

