समाजबांधवांना शीतपेय वाटप
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाजबांधवांना शीतपेय वाटप करण्यात आले तसेच संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. या प्रसंगी सलीम शेख, विनोद शेडकी, नकुल वासमवार, राम जंगम, सुमित बेले, संजय महाकालीवार, स्वप्निल पटकोटवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त समाजबांधवांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत मंच उभारण्यात आला होता. शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहोचताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

