कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ९८६०९१००६३, ७६२०२०८१८० – कोपरगाव तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकारिणीमध्ये विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून अपूर्व सुनील अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भरत मोरे, अस्लम भाई शेख हाडा प्रमोद अण्णा लबडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली . अपूर्व सुनील अहिरे हे विनोद भैय्या अहिरे (संभाजी ब्रिगेड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शिर्डी ) व अविनाश भाऊ अहिरे सामाजिक कार्यकर्ते यांचे पुतणे आहे अपूर्व अहिरे हे लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आले आहे त्याचेच श्रेय म्हणून माननीय खासदार भाऊसाहेब जी वाकचौरे साहेब यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधून कोपरगाव तालुका विद्यार्थी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांचे धामोरी व पंचक्रोशीत मोठ्या उत्साहात सत्कार समारंभ केले जात आहे त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो त्यांच्या हातून चांगली देश सेवा घडो अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभाशीर्वादांचा वर्षाव होत आहे.

