प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जय शिवाजी जय शिवाजी

0
47
Version 1.0.0

दऱ्याखोऱ्यातून आवाज घुमला, तोफ कडाडली
शिवनेरीवर जिजाऊ पुत्र जन्मला, राजा शिवाजी !
स्वराज्याचा नवा इतिहास,भवानीचा आशिर्वाद
बहुजनांचा आधार, श्री छत्रपती शिवाजी !

विजेसारखी तळपती तलवार हाती
स्वराज्य स्वप्न साकारणारा राजा शिवाजी !
मुठभर मावळ्यांना घेऊन भिडला मुघलांना
निधड्या छातीचा मर्द मराठा शिवाजी !

सह्याद्रीच्या कडेकपारीत, दऱ्याखोऱ्यात वाढला
शिस्तप्रिय पराक्रमी मावळ्यांचा राजा शिवाजी !
नाही कसली चिंता ,नाही कसली भिती
निच्श्रयाचा महामेरू,महाराष्ट्राची शान शिवाजी !

झेंडा स्वराज्याचा ,पराक्रम शिवराज्याचा
दिल्लीच्या तक्ताला आव्हान ,जय शिवाजी !
गनिमी कावे,सळसळती तलवार,विजयी रंग
त्वेषाने लढणारे ,गनिमानां कापणारे वादळ शिवाजी !

कुणी म्हणती सह्याद्रीचा वारा,सिंहांचा छावा
स्वराज्य स्वप्न साकारणारा राजा शिवाजी !
तत्व ऐक्याचे, सन्मान स्रीचा, धर्म लोककल्याण
महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, रयतेचा वाली शिवाजी !

गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here