माझी मराठी ही भाषा
माझा अभिमान आहे
गर्व आहे मला आज
तीच माझी जान आहे।।१।।
जन्म आमचा मराठी
याची मला जाण आहे
तिच्या रक्षणासाठीच
माझा सदा प्राण आहे ।।२।
आल्या किती भाषा इथे
खरोखर जगामध्ये
सदा फडकत राही
झेंडा बघा विश्वामध्ये।।३।।
नाही झुकणार कधी
मराठीचा कणा आहे
अभिमान वाटे येथे
स्वाभिमानी बाणा आहे।।४।।
माझ्या मराठीचे किती
आज गावे गुणगान
माझी मराठी मजला
इथे वाटे पंचप्राण ।।५।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे,
लातूर

