जन जन बोला प्रिय आम्हाला माय मराठी
युगापासुनी बोलत आलो माय मराठी
मनाआतले शब्दावाचुन कसे कळावे
व्यक्त व्हायची एकच भाषा माय मराठी
शब्द बीज ते काव्यामधुनी पेरत जावे
तरल स्वरांनी गीत कुणी सुंदर गावे
नादब्रम्हाची अनुभूती भाषेत मराठी
उत्साहाचा रंग पसरतो ऐकता मराठी
समृद्ध भाषा ज्ञान देई आम्हा जगताचे
ओव्या काव्य कथा ग्रंथ भांडार ज्ञानाचे
नवरसानी ,नवरंगानी शोभते मराठी
रुजवावी करण्या विस्तार मनात मराठी
जन्मापासून मिळाले प्रेमरुपी बंधन
भिनले आहे रक्तात तिचे मोहक स्पंदन
ती शारदा ,ती सरस्वती जीभेवर वसते
अभिजात, श्रेष्ठ भाषा माझी तिला वंदिते !
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा.

