जिवती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – 7-ईन मंत्री मंडळ अर्थात युवा संसद ४, ५, ६,तीन दिवशीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण सभागृह सुरु मुंबई येथे संपन्न झाले.या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यतून 36 जिल्हातुन 36अध्यक्ष आले आणि श्रीकांत राजपंगे चंद्रपूर वरून निवड झाली आहे तरी,
इन मंत्रिमंडळ युवा संसदेमध्ये या देशातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाल्यास त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल व शेतकरी कर्जबाजारी होणार नाही व आत्महत्या करणार नाही. त्यामुळे हा विषय सरकारने लक्षपूर्वक घेऊन शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घ्यावेत असे विचार या इन मंत्रिमंडळ युवा संसदेमध्ये मांडण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून युवा संसद म्हणून यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

