फार फार वर्षांपूर्वी,
आटपाट डगर,
डगरावर राहत होती बाई,
सोबत घेऊन वनराई,
त्याने केले वार,
तिला झाली पिल्लं चार,
तो गेला रानोमाळ,
ती करी पिल्लांसोबत मेंढपाळ,
तिने पेरले पिल्लासाठी दाने,
तीच गाऊ लागली लागली अंगाई गाणे,
तिनेच कोरली पिल्लांसाठी कोप,
पिल्लांना मिळावी शांत झोप,
तिनेच घेतला वनऔषधी चा शोध ,
तिनेच वेधला ऋतू बदलाचा बोध,
तीनेच मारली हाक धगधगत्या सूर्याला,
तिनेच दर्शविली वाट कुजबूजत्या सावलीला ,
तिनेच दिलं वळण सैरभैर पुरुषाला
अन घेतला वसा,
उमटवत कुटुंब वत्सलतेचा ठसा,
मला फुटतो पान्हा ,
पाहून बाळ तान्हा ,
मी काढते घान,
तू सांभाळ रान ,
तिने स्वीकारलं हसत हसत जन्माचं मातृत्व ,
त्याला देत जन्माचं दातृत्व,
तिचेच हे गोंदण आज पडलय तिला महाग,
करून स्त्री प्रधानतेचा त्याग ….
अन बनली बिचारी, अबला पुरुषप्रधान समाजात….
कवयित्री धनश्री चिताडे मुसणे
एफ ई एस गर्ल्स कॉलेज. चंद्रपूर

