प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – नारी शक्ती

0
49

समजू नकोस कमजोर तिला
ती धगधगता आहे अंगार
मनगटी पोलाद तिच्या
हातात तळपती आहे तलवार।।१।।

झाल्या किती रणरागिणी
शत्रूस पाजिले क्षणात पाणी
अशा मर्द या मायभावानी
नका घेऊ पंगा तिच्याशी कोणी।।२।।

सौंदर्याची खाण जरी ती
कोमल नाजूक देह नाही
अफाट शक्ती असे अंतरी
कमजोर तिचा वंश नाही।।३।।

माया ममता असे अंतरी
वेळप्रसंगी होई कठोर
नाजूक तिचा देह जरी का
लढले युद्ध तिने घनघोर।।४।।

अनेक रूपे जरी तिची का
कमजोर ती कुठेच नाही
नवदुर्गाचा अवतार घेऊन
या जगतास तारत राही।।५।।

नारी शक्तीची ठेवा जाण
प्रचंड बळ असते अंतरी
केला तिने इरादा पक्का
झेंडा फडकवी उंच अंबरी।।६।।

प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here