आठ मार्चला असतो
जागतिक महिला दिन
शुभेच्छांचा वर्षाव होतो
साजरा करतात विशेष दिन
आठ मार्चला होतो
स्त्रीचा मान सन्मान
देऊन तिला पुरस्कार
सन्मानच असतो तिची शान
जागतिक महिला दिन
मनवतात आगळा वेगळा
स्त्रियांसाठी खास दिवस
घरातही असतो थाट वेगळा
वर्षभर महिला
घरासाठी राबतात
घराची जबाबदारी
आनंदाने पेलतात
स्त्रीची अवहेलना
करू नये कोणी
स्त्री आहे घराचा प्राण
करावे तिचे रक्षण सर्वांनी
रेखा डायस
गोवा

