नको चंद्र तारे हवे रंग सारे
अश्या श्याम रंगात रंगून जाऊ
नको ती उदासी उराशी जराशी
कुणी मित्र शत्रू गळाभेट घेऊ
कशाला उगा भांडणे ती कुणाशी
पुन्हा सर्व नाती निभाऊन नेऊ
नभाच्या पल्याडी दिशा मोजताना
नव्याने जगालाच पाहून घेऊ
जुन्या आठवांना नको साद आता
जरा रंग उडवू जणू रंग वेडेच होऊ
कवाडे मनाची नव्यानेच खोलू
पुन्हा एकदा बघ नवे होत जाऊ
गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

