जयेंद्र चव्हाण विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा 9665175674 – भंडारा – पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ 16 मार्च 2025 ला सकाळी 10 वाजता रोज रविवारला निदर्शने करण्यात येत आहेत. यात प्रमुख मागण्या बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा, याकरिता 12 फरवरी 2025 पासून बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता बौद्ध भिक्खूंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याकरता त्याचप्रमाणे नागपूर येथे भंते सुरेई ससई यांच्या नेतृत्वात संविधान चौक ते दीक्षाभूमी चौक येथे 16 मार्चला 2025 ला शांती मार्च काढण्यात येत आहे.
त्याला पाठिंबा दर्शविण्याकरता व महाबोधी महाविहार पुरोहितांच्या हातून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा , 1949 च्या कायदा रद्द करण्यात यावा,याकरिता देश पातळीवर आंदोलन सुरू आहे .त्याकरिता शांतीवन बुद्ध विहार चिचाळ पवनी तालुका जिल्हा भंडारा येथे निदर्शने करण्यात येत आहेत करिता या निदर्शनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध ,विहाराचे सहयोगी संजीव भांबोरे, विनय ढोके महाबोधी उपासक संघ सहसचिव , भदंत विनयबोधी महाथेरो, भदंत नागसेन महाथेरो, भदंत सदानंद, भदंत रत्नासार, धम्मचारी विमलरत्न, धम्मचारी अमेयरत्न त्रिरत्न बौद्ध महासंघ,भिक्षूनी पट्टाचार्य ,श्रामनेर बुद्धपाल, भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ, यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.

