वसंत ऋतूत आली
हुताशनी पौर्णिमा
तिलाच म्हणतात होळी
करूया साजरा पूर्ण चंद्रमा
गवऱ्या लाकडे रचून
उभी करता होळी
बाजूला सडा रांगोळी
अन् नैवेद्य पुरणपोळी
प्रथा असते होळीतला
जळता नारळ काढण्याची
त्याच बरोबर वाईट
प्रवृत्तींना दहन करण्याची
नका तोडू वृक्षवल्ली
नको जंगलाचा ऱ्हास
सांभाळूया निसर्ग, प्राणी
जिवन करूया झक्कास
होळीच्या दुसऱ्या दिवशी
असते धुळीवंदन
एकमेकांच्या आयुष्यात आनंदाने
जीवनाचे करू नंदनवन
होळी आली होळी
दुर्गुणांची करूया होळी
वाईट विचारांची होळी
पसरवूया प्रेमाची झोळी
रेखा डायस
गोवा

