पिपरी पुनर्वसन येथे बहुजन नायक कांशीराम जयंती उत्साहात साजरी

0
129

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

(भंडारा )- येथून जवळच असलेल्या पिपरी (पुनर्वसन) येथे बहुजन समाजाचे उद्धारकर्ते बहुजन समाज पक्षाचे शिरोमणी बहुजन नायक कांशीरामजी यांच्या पुतळ्याजवळ आणि समाज मंदिरात कांशीरामजीच्या विचारांचं जयघोष करून 91 वी जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

फुले, शाहू, पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या मानवतावादी चळवळीच्या १०८ वर्षाच्या ऐतिहासिक संघर्षाला पुनर्जीवित व गतिमान करण्याकरिता आपल्या नौकरीचा व ऐश्वर्याचा त्याग करून महापुरुषांच्या मानवतावादी विचारांचा राष्ट्र घडविण्याकरिता ध्येय वेडा होऊन अथक संघर्षातून भारतीय, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पटलावर आपल्या संघर्षशील कार्याचा अमिट ठसा उमटवून भारतीय राजकारणात शोषित, वंचित, उपेक्षित, बहुजन समाजात सामाजिक व राजकीय चेतना निर्माण करण्याकरिता जाती जातीमध्ये विखुरलेल्या ८५ टक्के बहुजन समाजाला जागृत व एक संघ करून सामाजिक व राजकीय नवं परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करून आंबेडकरी चळवळ गतिमान करणारे बहुजन नायक कांशीराम यांची ९१ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी च्या वतीने पिपरी पुनर्वसन येथे नुकतीच साजरी करण्यात आली.

या जयंती समारोहाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम शेंडे, सामाजिक चळवळीचे नेते पँथर परमानंद मेश्राम, डॉ देवानंद नंदागवळी, प्रिया शहारे, पुरुषोत्तम शहारे, ॲड. रामटेके, ईश्वरी शेंडे, अमिता मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बहुजन हृदय सम्राट कांशीराम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून व जयघोष करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कांशीराम यांच्या संघर्षमय जीवन कार्यावर प्रकाश टाकून बहुजन समाजाने शासनकर्ती जमात व्हावे याकरिता केलेल्या महत्त्वपूर्ण संघर्षाची आठवण करून दिली व महापुरुषांच्या विचारांचा राष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन केले.

यावेळी परिसरातील व जिल्ह्यातील सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्त्यांची बहुजन नायकास अभिवादन करण्याकरिता उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक चवरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार समीक्षा चवरे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नितीन मेश्राम, कुंदा चवरे, प्रफुल रामटेके, उन्नती चवरे, निश्चय चवरे, जिन्नत चवरे, बाळकृष्ण चवरे, भारती चवरे, मालू खोब्रागडे, सुमन रामटेके, ज्ञानेश्वर पिल्लेवान इत्यादींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here