कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे – दि.16/3/2025 कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्र कोकमठाण गावात कुळदैवत माता लक्ष्मी आई मंदीरात गोदावरी नदीच्या काठावर साजरी करण्यात आली आहे सदर तुकाराम बीज कार्यक्रम प्रसंगी रामदासी महाराज भक्त मंडळ यांचे भजनाचा कार्यक्रम झाला आहे नंतर दहीहंडी हंडीचा कार्यक्रम झाला असुन नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे सदर कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन रामभाऊ महाराज महाजन, विणेअरी विष्णुपंत महाराज टेके,ह.भ.प कैलास महाराज रक्ताटे, आप्पासाहेब लोहकणे, भास्कर महाराज देशमुख मृदंग वादक, अंकुश महाराज वाळुंज, गायनाचा कार्यक्रम हरीभाऊ लोहकणे केशव टेके, मच्छिंद्र वाळुंज, तसेच महीला भजनी मंडळ पण हजर होते अन्नदान सेवा राजेंद्र भाऊ कवडे पाटील परीवार तसेच सदर ठिकाणी आनंदात तुकाराम महाराज बीज साजरी करण्यात आली आहे अशी माहिती पञकार प्रसिद्ध साठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील यांनी दिली आहे.

