जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन रविवार दिनांक ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ पर्यंत करण्यात आले आहे.
नवसाला पावणारी म्हणजे शितला माता होय. ६२ वर्षापूर्वी भंडारा येथील हिंदू व मुस्लीम बांधव एकत्र येऊन प्रत्येकांनी आप – आपल्या शक्ती नुसार मदत करून आदिशक्ती शितला माता मंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी परिसरातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पाहिजे तेवढ्या प्रमाणात मंदिराचा विकास झालेला नव्हता. मात्र नव- नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर विकास करण्यात आला. व शिरला माता मंदिराचा जीर्णोद्धार होण्यास सुरुवात झाली. शितला माता मंदिर येथे अश्विनी नवरात्र, देव दिवाळी, नवग्रह व शनि जयंती तसेच चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. आता चैत्र नवरात्र निमित्ताने घट स्थापना दिनांक ३० मार्च २०२५ ला सकाळी ९ वाजेपासून १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. अष्टमी पूजा व हवन कार्य शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ ला दुपारी ४ वाजता होईल. घट विसर्जन रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ ला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. तसेच यादरम्यान दैनंदिन आरती सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता शितला माता मंदिर येथे होणार आहे.
तरी जिल्ह्यातील भाविक भक्तांनी जास्तीत -जास्त संख्येने उपस्थित राहून चैत्र नवरात्र उत्सवाचा लाभ घ्यावा तसेच ज्या भाविक- भक्तांना घटस्थापना करायची आहे. त्यांनी शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे, मोबाईल नंबर ९८६०४६५३७९ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन शितला माता मंदिर देवस्थान समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

