जागतिक जल दिनानिमित्य विविध स्पर्धेचे आयोजन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय येथे 22 मार्च 2025 रोज शनिवारला जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक जल दिनानिमित्य विविध उपजराम राबविण्यात आले.निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.शालेय विद्यार्थिनींनी सर्व उपक्रमामध्ये उत्स्पुर्तपणे सहभाग घेतला.पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी नाटिका सादर करण्यात आली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.भारती गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या जागतिक जल दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थिनी यांना जल प्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

