जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
( भंडारा )- जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळा लोहारा येथे गेल्या वर्षभरापासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडून त्यांना प्रेरणा दिल्या जात आहे. त्यापैकी एका उपक्रम म्हणजे मुलाखत मान्यवरांची. विविध क्षेत्रात ज्यांनी संघर्ष करुन नावलौकिक केलेला आहे अशा मान्यवरांना निमंत्रित करुन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून विद्यार्थी प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेत असतात. या उपक्रमाअंतर्गत रामटेक येथे कार्यरत असणारे LIC चे विकास अधिकारी रविंद्र सपाटे यांना निमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या वतीने त्यांना भारतीय संविधान ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक डी. के. पराते हे होते. रविंद्र सपाटे यांनी त्यांच्या विद्यार्थी जिवनापासून ते विकास अधिकारी होण्यापर्यंतचा अनुभव सांगितला. विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून अधिकची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे प्रश्नोत्तरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पुढच्या वर्षी शाळेत शंभर टक्के उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यास सपाटे साहेबांनी पारितोषिक देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भुसारी यांनी केले. तर आभार राजपाल गजभिये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अरविंद कुमरे , निशांत पारधी , स्वयंसेवक रजिया घोडिचोर आणि सूमित माकडे यांनी नियोजन केले.

