
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी तालुक्यातील येत असलेल्या मौजा – नंदिगाव येथे दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा आंबेडकर जयंती – ज्याला भीम जयंती म्हणूनही ओळखले जाते – हा दिवस भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार आणि सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणाचे समर्थक डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नंदिगाव येथे साजरा करण्यात आले. व त्या जयंतीला माजी. पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांचे हस्ते प्रतिमेला मालार्पण करून व पूजा अर्चना व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी, बाबुराव तोर्रेम, रमेश बानकर, गणपत दहागावकर गुड्डीगुडम, रमेश सोयम, ग्राम पंचायत सदस्य देवलमारी शशिकला मोहुंदा, उषा पांडे, सामाजिक कार्यकर्ता राजू सिडाम, तिरुपती मडावी आकाश राऊतसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व गावकरी नागरिक उपस्थित होते














