दिव्यांग विवाह प्रोत्साहन व क्रीडा स्पर्धा यशस्वींचा सत्कार

0
108

गडचिरोली दि.१७ एप्रिल: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक १७ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या ११ जोडप्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३ लाभार्थी जोडप्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे हस्ते धनादेश व भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. यासोबतच राज्यस्तरीय दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांचा देखील श्री. सुहास गाडे यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी वर्षा ढवळे, सहाय्यक लेखा व प्रशासन अधिकारी पुष्पा पारसे, विस्तार अधिकारी जगदीश मेश्राम, समाजकल्याण निरीक्षक निलेश तोरे तसेच निखील उरकुडे, माया गायकवाड, नरेश नायक यांचा सहभाग होता. समाजकल्याण विभागाचे तसेच दिव्यांग शाळांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here